सजग राहण्याचा सराव चालताना,जेवताना,आंघोळ करताना,कोणतेही काम करताना देखील करता येते. बऱ्याच वेळा आपण अॅटो पायलट मोड वर असतो,आपल्या कृती,हालचाली यांत्रिकतेने होत असतात. आपण आंघोळ करीत असतो पण मन तिथे नसते ते विचारात गुंग असते.सजगतेचा अभ्यास करायचा म्हणजे शरीराच्या सर्व हालचाली जाणीवपूर्वक करायच्या,प्रत्येक क्षणाचा अनुभव पंच ज्ञानेंद्रियांनी समरसून घ्यायचा.आंघोळ करताना अंगावर पाणी जाणीवपूर्वक घ्यायचे, पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श अनुभवायचा,साबणाचा वास अनुभवायचा,जेवताना प्रत्येक घास जाणीवपूर्वक घ्यायचा. Knowing what you are doing is mindfulness,शरीर काय करीत आहे याची मनाला जाणीव असणे म्हणजे सजगता.प्रत्येक कृतीचे अवधान ठेवणे म्हणजे सजगता.
मुलांना नेहमी लक्ष द्या असे सांगितले जाते।पण लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे हे त्यांना समजत नाही,लक्ष कसे द्यायचे हे कोठे शिकवलेही जात नाही।आपले लक्ष विचारांमुळे विचलित होत असते।या विचारात गुंतून न जाता एकाग्रता कशी वाढवायची याचे ट्रेनिंग या मेंदूच्या व्यायामाने मिळत असते।माइंडफुलनेस वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.आपण आपले मन ठरवलेल्या गोष्टीवर म्हणजे आवाजावर पुनः पुन्हा आणतो त्यावेळी मेंदूतील अटेन्शन सेंटर काम करू लागते,आपल्या मेंदूच्या फ्रंटल लोबमध्ये हे अटेन्शन सेंटर असते.त्याला असा व्यायाम दिल्याने ते अधिक सक्रीय होते त्यामुळे आपला फोकस वाढू लागतो, आपण बीइंग इन द झोन राहू लागतो।
एकदा तुम्हाला श्वासाचा स्पर्श समजू लागला कि माइंडफुलनेसचा सराव तुम्हाला कधीही कोठेही करणे शक्य होते.कारण श्वास सतत आपल्या सोबत असतोच.तो घरी विसरला आणि मी कामावर आले असे कधी होत नाही.त्यामुळे रांगेत उभे असताना,गाडीतून प्रवास करताना,कंटाळवाणे लेक्चर ऐकत असताना कधीही कोठेही तुम्ही श्वासाचा स्पर्श जाणू शकता.ज्या श्वासाचा स्पर्श समजला तो चांगला श्वास,गुड ब्रेथ कारण त्यावेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड बदलला.